पिंपळसुटीतील प्रा.सचिन तांबेंचे सेट परिक्षेत यश

Image may contain: 1 person, eyeglasses and suitपिंपळसुटी,ता.१६ जुन २०१८(प्रतिनीधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २८ जानेवारी २०१८ रोजी घेतलेल्या  सेट परीक्षेत इतिहास विषयात पिंपळसुटी (ता.शिरुर)येथिल प्रा.सचिन आनंदराव तांबे यांनी यश मिळविले आहे.

प्रा.सचिन तांबे यांनी यापूर्वी २०१६ मध्ये भूगोल विषयातही सेट परीक्षा उत्तीर्ण केलेली असून सध्या ते कस्तुरी शिक्षण संस्था शिक्रापूर येथे सहाय्यक अध्यापक म्हणून कार्यरत आहेत.भूगोल अन इतिहास अशा दोन्ही विषयात सेट उत्तीर्ण झाल्यामुळे परिसरातून त्यांचे कौतूक होत आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापकपदासाठी सेट(राज्यस्तरासाठी) तर नेट (देशस्तरासाठी) अनिवार्य केलेली आहे.त्यामुळे राज्यात सेट-नेट धारकांची कमतरता भासत असताना प्रा.सचिन तांबे यांनी मिळविलेले हे यश परिसरातील लोकांसाठी कौतुकास्पद ठरले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या