शिक्रापूर-तळेगावमधील ग्रामस्थांचा पाण्यासाठी रास्तारोको

शिक्रापूर, ता. 22 जून 2018: पावसाअभावी शिक्रापूरची पाणी पूरवठा योजना बंद होत आहे. याबाबत मागणी करुनही चासकमानचे पाणी नदीपात्रात सोडले जात नाही. येत्या दोन दिवसात नदीपात्रात न सोडल्यास शिक्रापूरात रास्तारोको करण्याचा इशारा शिक्रापूरचे सरपंच व सर्व पक्षीय पदाधिका-यांनी दिला. या आंदोलनात तळेगाव ढमढेरे ग्रामस्थही सहभागी होणार आहेत.

शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे व पुढील कालवाकाठच्या गावांच्या पाणी योजना चासकमानच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शिक्रापूरतील पाणी पूरवठा विहीरीने तळ गाठला असून, शेजारीच असलेल्या नदीपात्रात पाणी नसल्याने शिक्रापूरकरांना पाणी पूरवठा करणे ग्रामपंचायतीला कठीण होत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाला वारंवार सांगूनही वेळनदीपात्रात पाणी सोडले जात नसल्याची तक्रार सरपंचांनी केली. याबाबत गावच्या गंभीर प्रश्नाबाबत चासकमान कालवा प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास सोमवारी (ता. २५) येथील चाकण चौकात पुणे-नगर महामार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर परीसरात भीषण पाणीटंचार्इ
Image may contain: one or more people, outdoor and nature
तळेगाव ढमढेरे, ता. 18 जून 2018 (एन. बी. मुल्ला): तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर येथील वेळ नदीवरील बंधारे कोरडे पडल्याने पाणी टंचार्इची भीषण समस्या निर्माण झाली आहे. शिरूर तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली असून अद्याप एकही मोठा पाऊस झालेला नसल्याने बळीराजा चिंतातूर असून खरीपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. त्यामुळे चासकमानचे पाणी डाव्या कालव्याबरोबरच वेळ नदीतून सोडण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

तळेगाव ढमढेरे येथील भैरवनाथ बंधारा तसेच शिक्रापूर येथील कोल्हापूर पध्दतीचा बंधारा कोरडा पडला आहे. चासकमानचे आवर्तन वेळेवर सोडले तरच वेळ नदीला पाणी सुटते व बंधारे भरले जातात. गेल्या पंधरा दिवसापासून वेळ नदीवरील बंधारे कोरडे पडले आहेत. तळेगाव ढमढेरे येथील नळ पाणी पुरवठा योजना भैरवनाथ बंधाऱयावर अवलंबून आहे. मात्र बंधाऱयातच पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याची तसेच दुय्यम वापरासाठी आवश्यक पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. बंधारा भरल्यानंतर सुमारे महिणाभर पाण्याचा प्रश्न सुटतो. पिण्याच्या पाण्याची समस्या तर तळेगाव व शिक्रापूरकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. वेळ नदीतील जलप्रदूषणामुळे व पाणी शुध्दीकरणाची कोणतीही यंत्रणा नसल्याने येथील नागरीकांना पिण्याचे पाणी विकतच घ्यावे लागते.

शिक्रापूर येथील नळपाणीपुरवठा योजनावेळ नदीवरील भैरवनाथ बंधारा व येथील विहीरीवर अवलंबून आहे. सध्या येथील ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, पाण्याच्या टंचार्इमुळे अगदी कमी वेळ पाणी सोडले जात असून त्यामध्ये नियमीतता देखील नाही त्यामुळे पिण्याच्या व वापराच्या पाण्याची भिषण समस्या निर्माण झाली आहे.  बहुतांश नागरीकांना 600 ते 700 रूपये मोजून 7 हजार लिटरचा टँकर घ्यावा लागतो. परंतु पाणी साठविण्याची व्यवस्था नसेल तर नागरीकांची पैसे मोजूनही पाणी घेण्याची अडचण होते. पिण्याचे पाणी तर दररोज सुमारे 10 ते 20 रूपाये देवून 20 लिटर विकत घ्यावे लागते. ऐन पावसाळयात देखील भिषण पाणी टंचार्इ निर्माण झाल्याने व चासकमान धरणात अद्यापही सुमारे 7 टीएमसी पाणी साठा असल्याने चासकमानचे पाणी तातडीने वेळ नदीतून सोडण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे. वेळ नदीतून चासकमानचे पाणी सोडल्यास किमान महिणाभराचा पाण्याचा प्रश्न सूटणार असून नदी काठच्या गावांना शेतीसाठी देखील हे पाणी उपयुक्त ठरणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या