शिरुर तालुका शिवसेनेचे शुल्क वाढीविरोधात निवेदन

शिरुर,ता.१९ जुन २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील खासगी शाळा महाराष्ट्र शुल्क अधिनियम कायद्याचे उल्लंघन करत आवश्यक असणा-या सुविधा न पुरविता  अतिरिक्त वाढीव फी (शुल्क) आकारणा-या व २५ टक्के आरक्षित पाञ विद्यार्थ्यांचे प्रवेश पारदर्शकपणे न दाखविणा-या शाळा व्यवस्थापनावर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा शिरुर तालुका शिवसेना याविरुद्ध जोरदार आंदोलन करेल असा इशारा शिरुर तालुका शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

यांसंबंधीचे निवेदन शिरुर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांना देण्यात आले.दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, शिरुर तालुक्यातील खासगी व सरकारी शाळाबाबतीत पालकांत नाराजी आहे अतिरिक्त शुल्क व सुविधा,अॅडमिशन घोळ या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता शाळा व्यवस्थापन सरकारला न जुमानता मनमानी कारभार करत आहे.

शुल्क अधिनियम कायद्यानुसार वार्षिक १५ % फी वाढ न आकारता अतिरिक्त अवाजवी फी आकारली जाते.शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लुट केली जाते.२५ % आरक्षित असणारे अॅडमिशन न दाखवता  सर्वसामान्य गरीब विदयार्थ्यांना अॅडमिशन नाकारले जाते.अतिरिक्त फी शुल्क नावाखाली प्ले ग्राउंड,फिल्टर पाणी, विद्यार्थ्यांच्या तुलनेत शौचालय,डिजिटल लॅब व सामुग्री,ग्रंथालय,कमी प्रतीचे दप्तर,हलक्या प्रतीचे ड्रेस कोड,शाळा परिसरात  सी.सी.टि.व्ही, इ.सेवा पुवण्यात येत नसुन शिक्षणाच्या नावाच्या दर्जाखाली सामान्य नागरिकांची लुट करणे या बाबींचा विचार करत या विभागामार्फत सरकारने ताबडतोब कार्यवाही करावी अन्यथा शिरुर तालुका शिवसेना आंदोलन करेल असा इशारा या वेळी देण्यात आला.

या वेळी शिरुर तालुका  शिवसेना शेतकरी सेनेचे योगेश ओव्हाळ,शिरुर शहर शिवसेना संघटक राजेंद्र शिंदे,माजी शिरुर शहरप्रमुख बलराज मल्लाव,शिरुर हवेली संपर्कप्रमुख राजेश सोनवणे,सुनिल जठार, शैलजा दुर्गे,आकाश संकपाळ,हेमंत चव्हाण,ओंकार बिरदवडे,राजेश खेडकर आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या