कुरुळीतील जुन्या शाळेचा होणार लिलाव

कुरुळी, ता. 23 जून 2018 (संपत कारकूड): येथील जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीचा जाहीर लिलाव करुन त्या पाडण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतीस दिल्यामुळे या इमारतींची लिलाव प्रक्रिया सोमवारी (ता. 25) घेण्यात येणार आहे.
 
सन 1961 पासून विद्यादानाची मंदिरे समजली जाणाऱया या चार वर्गांमध्ये लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानदान मिळाले. अनेक विद्यार्थी शिकले. डॉक्टर, वकील, इंजिनिअर आणि शिक्षकही झाले. गावच्या जुन्या वैभवापैकी या चार खोल्यांचा समावेश होता. परंतु, खोल्या जुन्या व मोडकळीस आल्यामुळे तसेच शाळेसाठी गायरानामध्ये जागा देवून तिथे नवीन खोल्यांचे बांधकाम पुर्ण होऊन तिथे नियमित शाळा चालू झाल्यामुळे या खोल्या पडून होत्या.

गावामध्ये अडीच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर येथे सरपंच आणि उपसरपंच बदलले गेले. नुकत्याच निवडून आलेल्या सरपंच सौ. प्रतिभा प्रमोद बोरकर आणि उपसरपंच मंदा बोरकर, सदस्य रायबा बोरकर, श्याम हरिहर, अशोक घोरपडे, सोनाली देशमुख, हजरभी जखाते या सदस्यांना बरोबर घेवून शाळेच्या जुन्या इमारती पाडून येथे प्रशस्त चौकासाठी जागा मोकळी करण्यासाठी वरील सर्वांनी मेहनत घेतल्याचे सरपंचांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या