तहसिलदारांची वाळूचोरांवर धडक कारवाई (Video)

Image may contain: 3 people, people standing, cloud, sky, outdoor and natureशिरुर,ता.२४ जुन २०१८(प्रतिनीधी) : शिरुरचे तहसिलदार  रणजित भोसले यांनी सुट्टीचा दिवस असुनही कर्तव्य बजावत शिरसगाव काटा(ता.शिरुर) येथील वाळुचोरांवर धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत उत्खनन केलेले वाळुचे साठे जप्त केले.
Image may contain: one or more people, people standing, sky, tree, wedding, child, outdoor and nature

सविस्तर असे कि, शिरसगाव काटा(ता.शिरुर) येथील नदीपाञात राञीच्या वेळेस अनधिकृतपणे चोरुन वाळु उपसा सुरु होता.याबाबत महसुल विभागाला माहिती मिळाली होती.परंतु अचानक नदीपाञात गेलेल्या पथकालाही वाळुचोरांनी गुंगारा दिला होता.या वाळुचोरांमुळे स्थानिक ञस्त झाले होते.दरम्यान शनिवार(दि.२३) रोजी सकाळी सरपंच सतीश चव्हाण, उपसरपंच प्रकाश जाधव,माजी सरपंच रामचंद्र केदारी, तंटामुक्ती अध्यक्ष विजय जगताप,प्रविण कदम,घोडगंगा  संचालक नरेंद्र माने,माजी सरपंच संजय शिंदे, तक्रारदार शरद गद्रे, तलाठी वाय.एम.टिळेकर,कोतवाल यांसह ग्रामस्थांनी नदीपाञात जाउन पाहणी केली असता, शिरसगाव हद्दीत अनधिकृतपणे वाळुचोरांनी वाळु चोरी करुन मोठ्या प्रमाणावर वाळुचा साठा केलेला होता.
याबाबत ग्रामस्थांनी शिरुर चे तहसिलदार रणजित भोसले यांना  माहिती देण्यात आली.तहसिलदार रणजित भोसले यांनी चौथा शनिवार हा सुट्टीचा दिवस असुन व मतदार याद्यांचे पुनरिक्षणाचा व्यस्त कार्यक्रम असुनही शिरुर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचा-यांसह धाव घेत अनधिकृत वाळु साठ्यांची पाहणी केली.व सुमारे 35 ब्रासपेक्षा जास्त वाळु जप्त केली.याबाबत रणजित भोसले यांनी बोलताना सांगितले कि, मी व्यस्त असुनही माहिती मिळताच तातडीने धाव घेत वाळु साठा जप्त केला असुन जप्त केलेला वाळुसाठा वाहनांमध्ये भरुन हा वाळुसाठा तळेगाव येथील गोडावुनला जमा केला जाणार आहे.या कारवाईत तहसिलदार रणजित भोसले यांसह तलाठी वाय.एम.टिळेकर,पोलीस हवालदार श्रावण गुपचे,आंबेकर आदींनी सहभाग घेतला.

शिरुर चे तहसिलदार रणजित भोसले यांनी  मतदार पुनर्रिक्षणाचा व्यस्त कार्यक्रम असुनही तातडीने स्वत: नदीपाञात उतरुन धडक कारवाई केल्याने ग्रामस्थांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या