नोकरी करत करडे येथील युवक झाला फौजदार

करडे,ता.२४ जुन २०१८(प्रतिनीधी) : करडे येथील शेतकरी कुटुंबातील युवकाने कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन फौजदार होण्याचा बहुमान मिळवला.

नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत करडे (ता.शिरूर) येथील अमोल देवराम जगदाळे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवकाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पी.एस्.आय. बनण्याचे स्वप्न साकार केले. अल्पशिक्षित वडिल आणि अशिक्षित आई अशा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील निलेश यांना खरे तर शिक्षक व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी डी.एड्. ची पदविका प्राप्त केली. मात्र शिक्षक भरती बंद असल्याने शिक्षक होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर त्यांनी रांजणगांव औदयोगिक वसाहतीमध्ये कामगार म्हणुन नोकरी स्विकारली. त्याचवेळी त्यांनी पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर पुणे येथे राहुन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने क्लासेसची फी भरु शकत नसल्याने त्यांनी ' सेल्फ स्टडी ' करत तिसऱ्या प्रयत्नात यश संपादन केले. या दरम्यान त्यांना आई सरस्वती, वडिल देवराम, भाऊ दादाभाऊ, अरुण, राजेंद्र आणि गणेश यांचे मोठे पाठबळ लाभले. या निवडीनंतर करडे ग्रामस्थांनी अमोल यांची मोठी मिरवणूक काढुन जंगी सन्मान केला.

यावेळी अमोल यांची आई " मुलगा साहेब झाल्याचे ऐकुन फार- फार आनंद झाला. माझ्या सर्व कष्टांचे चिज झाले. त्याने समाजाची सेवा करावी, एवढीच अपेक्षा " असल्याचे बोलताना व्यक्त केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या