मांडवगण फराटाच्या विद्यार्थ्यांचे चमकदार यश

Image may contain: 25 people, people smiling, people standingमांडवगण फराटा, ता.२६ जुन २०१८(प्रतिनीधी) : महाराष्ट्र राज्य प्रज्ञाशोध परीक्षेत (एम.टी.एस) तसेच राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत (एन.एम.एम.एस) मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यश मिळविल्याची माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक नरेंद्र व्यवहारे यांनी दिली.

प्रशालेतील ५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. इयत्ता आठवी, नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. एन.एम.एम.एस. परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी पर्यंत शिष्यवृत्ती तर एम.टी.एस.परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना रोख बक्षीसे तसेच प्रशस्तीपत्र देण्यात येते.
                       
इयत्ता नववी मधील वैष्णवी कैलास राऊत, अर्पिता रविंद्र ढगे, केशवराज ज्ञानेश्वर कुंभार, रितेश सुरेश चव्हाण, पुष्पा भीमराव कांबळे या विद्यार्थ्यांनी एम.टी.एस. परीक्षेत यश मिळविले. तर अनुष्का दादासाहेब शेलार या विद्यार्थिनीने राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत (एन.एम.एम.एस) गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. प्रशालेतील अध्यापक राजेंद्र कांबळे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गर्शक शिक्षकांचे  मुख्याध्यापक नरेंद्र व्यवहारे, उपमुख्याध्यापक सुनील थोरात, पर्यवेक्षक रघुनाथ हांडे यांनी अभिनंदन केले. यावेळी तंटामुक्त ग्रामसमितीचे अध्यक्ष हनुमंत फराटे, योगेश फराटे, राजू कांबळे, मोहन शेलार व ग्रामस्थ उपस्थित होते. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या