वाढदिवसाचा खर्च टाळुन शिक्रापूर रोटरीला मदत
शिक्रापुर,ता.२७ जुन २०१८(प्रतिनीधी) : वाढदिवसाचा खर्च टाळुन उद्योजक रमेश भुजबळ यांनी समाजकार्यासाठी शिक्रापूर रोटरी क्लबला दहा हजार रुपयांचा धनादेश दिला.
शिक्रापूर येथील रमेश भुजबळ यांना समाजकार्याची आवड असल्याने ते वेगवेगळ्या सेवाभावीसंस्थेवर काम करत आहेत. दरवर्षी वाढदिवसाला वायफळ खर्च न करता ते सामाजिक जाणीव ठेवुन वेगवेगळ्या संस्थाना मदत करत असतात.
त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज मंगळवार(दि.२६ जून) रोजी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून शिक्रापूर रोटरी क्लबला समाजकार्यासाठी समारंभपूर्वक १० हजार रुपयांचा धनादेश रोटरीचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी नीलेश थोरात, मारुती खेडकर, बाळासाहेब लांडे, लधाराम पटेल, अतुल ताजणे, लक्ष्मण नरके आदी उपस्थित होते.