शिरुर तालुक्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी
शिक्रापुर,ता.२८ जुन २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात वटपौर्णीमा उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळपासूनच महिलांनी वटवॄक्षाची पुजा करण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी केली होती.
तळेगाव ढमढेरे परीसरात बुधवार(दि.27) रोजी हिंदू संस्कॄती नुसार महिलांनी पतीच्या दिर्घायुष्यासाठी व्रत ठेवून जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे अशी प्रार्थना करून व वटवॄक्षाची पुजा करून वट पौर्णिमा उत्साहात साजरी केली.तळेगाव ढमढेरे,शिरुरसह परीसरातील शिक्रापूर, धानोरे, दरेकरवाडी, सणसवाडी, कोरेगाव भिमा, पेरणे फाटा, विठ्ठलवाडी, निमगाव म्हाळुंगी, कासारी, टाकळी भिमा, घोलपवाडी, दहीवडी, पारोडी, अरणगाव, उरळगाव, न्हावरे, करडे, आंबळे, पिंपळे जगताप, मुखर्इ,जातेगाव,, कोंढापुरी आदी ठिकाणी सकाळपासूनच महिलांनी वटवॄक्षाची पुजा करण्यासाठी गर्दी केली होती.वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पतीच्या दिर्घायुष्यासाठी साकडे घालण्यात येत होते.यावेळी सर्व सुवासीनींनी एकमेकींना हळदी कुंकू लावून हा सण साजरा केला.