कासारीच्या पोलिस पाटीलपदी रुपाली भुजबळ

Image may contain: 1 person, closeupकासारी,ता.२८ जुन २०१८(प्रतिनीधी) : कासारी गावच्या पोलिस पाटील पदी रुपाली अतुल भुजबळ यांची निवड झाली आहे.

उपविभागीय दंडाधिकारी यांनी भुजबळ यांना नुकतेच नियुक्ती पञ दिले आले.कासारी(ता.शिरुर) येथील रुपाली भुजबळ यांची इतर मागसवर्ग महिला प्रर्वगातुन निवड झाली आहे. पोलीसपाटील पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेत त्यांना १०० पैकी ७२ गुण मिळाले या परीक्षेच्या आधारे व त्यानंतर झालेल्या मुलाखतीतून भुजबळ यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांचे या निवडीबद्दल तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या या निवडीने प्रथमच महिला पोलिस पाटील म्हणून कासारी गावाला मान मिळाला आहे.नवनियुक्त पोलीस पाटील रुपाली

भुजबळ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पोलिस पाटील पदाच्या माध्यमातुन प्रामाणिकपणे लोकांच्या  समस्या सोडविण्याचा व  समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर बोलताना रुपाली भुजबळ यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या