प्रा.बाळासाहेब गायकवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Image may contain: 3 people, people smiling, people standingनिमोणे,ता.२८ जुन २०१८(प्रतिनीधी)  : निमोणेतील प्रा.बाळासाहेब गायकवाड यांना नुकताच 'आदर्श शिक्षक' पुरस्कार देउन गौरविण्यात आले.

उरुळी कांचन येथे आयोजित ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा ' यांच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष भिमराव धीवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छत्रपती शाहु महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील बाळासाहेब गायकवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच यावेळी शिरूर तालुक्यातील १२ शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी डायसचे संचालक रविंद्र चव्हाण, पुणे जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई गावडे, हवेली तालुका पंचायत समिती सदस्या हेमलता बढेकर, सोपानराव कांचन, समितीचे अध्यक्ष भिमराव धिवार, उपाध्यक्ष दिलीप लगड, सचिव प्रा.रा.वि.शिशुपाल, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे दादासो गवारे, शिरुर तालुकाध्यक्ष अशोक दरेकर, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास शेलार शिरूर तालुकाध्यक्ष बापूसाहेब लांडगे, वसंतराव खरात, भरत काळे, नवनाथ गव्हाणे, प्रकाश दुर्गे, रोहीदास काळे, मच्छिंद्र बांदल यांसह मोठया प्रमाणावर मान्यवर उपस्थित होते.

प्रा.बाळासाहेब गायकवाड यांचे शैक्षणिक क्षेञाबरोबरच सामाजिक क्षेञात भरीव योगदान असुन निमोणे परिसरात अनेक सामाजिक प्रश्न 'निमोणे आयडॉल्स' च्या माध्यमातुन सोडविले जात आहेत.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या