पावसाने मारलीय दडी; शेतकरी वर्गात चिंता

Image may contain: cloud, sky, outdoor, nature and water
शिरुर, ता. ३ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या असुन शेतक-यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी समाधानकारक पाउस झाल्याने शिरुर तालुक्यात या वर्षी उन्हाळ्यात पाण्याचे फारसे दुर्भिक्ष जाणवले नाही.शिरुर तालुक्यातील घोड धरणातुन पाणी सोडल्याने धरणावर अवलंबुन असलेल्या गावांना याचा चांगलाच फायदा झाला.घोड धरणावरील बंधा-यांत पाणी साठवल्याने फेब्रुवारी पर्यंत शेतीला पाणी मिळु शकले. हे चिञ या वर्षी प्रथमच पहायला मिळाले. त्याचप्रमाणे भिमा नदीवरील बंधा-यात पाणी साठवल्याने बंधा-यावर अवलंबुन असलेल्या शिरुर व दौंड तालुक्याला याचा मोठा फायदा झाला.त्याचप्रमाणे शिरुर तालुक्याच्या पश्चिम पट्टयात जुन महिन्यात दोन मोठे पाउस झाल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

तालुक्यात काहि ठिकाणी शेतक-यांनी पाउस पडेल या आशेने पेरण्या केल्याचे चिञ दिसत असले तरी काही भागात अद्याप एकाही मोठ्या पावसाने हजेरी न लावल्याने पेरण्याच होउ शकल्या नाहीत. शिरुर तालुक्यात जुन महिना कोरडा गेल्याने  जुन महिन्यात मुग, बाजरी आदी पेरण्या खोळंबल्या आहेत.अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असुन चारा टंचाई जाणवु लागली आहे.ज्या शेतक-यांनी पेरण्या केलेल्या आहेत,ते मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जुन महिन्याच्या अगोदर तालुक्यात शेतक-यांनी शेताच्या मशागती करुन ठेवल्या असुन शेतातील ढेकळंच फुटली नसल्याने व जुन महिना पुर्ण कोरडा गेल्याने अनेकांच्या चिंतेत वाढ झाली असुन जुलै महिन्यात समाधानकारक पाउस झाल्या तरच पेरण्या होणार आहे.

पावसाने ओढ दिल्याने विंधनविहिरी, विहिरी, तळी, कोरडी पडली आहेत.शिरुर शहर व परिसरात मान्सुन पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गात तीव्र चिंतेचा सुर असुन पाउस न झाल्याने शिरुर शहरालगत जाणारी घोडनदीचे पाञ कोरडे ठणठणीत पडले असुन येत्या पंधरा दिवसांत पाउस न झाल्यास शिरुर शहरावर भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची परिस्थिती ओढावु शकते.पाउस लांबल्याने बाजारपेठेत फारशी वर्दळ दिसुन येत नाही. जून महिन्यापासुनच शेतक-यांची खते व बि-बियाने खरेदी साठी गर्दी होत असते परंतु अद्याप तशी गर्दी कोठेही दिसुन येत नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या