डॉक्टरांनी पोटातून काढला १० किलोचा गोळा (Video)

Image may contain: one or more people and people sittingमांडवगण फराटा,ता.३ जुलै २०१८(प्रतिनीधी) : मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथील वरदविनायक हॉस्पिटल मध्ये अतिशय क्लिष्ट व अतिशय मोठी शस्ञक्रिया करुन पोटातुन सुमारे १० किलोचा टयुमर यशस्वी काढण्यात यश आले.

याबाबत सविस्तर असे कि, दौंड तालुक्यातील एका रुग्णाच्या पोटात  ट्युमर ची गाठ असल्याचे निष्पन्न झाले होते.हि गाठ काढण्यासाठी शस्ञक्रिया करणे गरजेचे होते. मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथील वरदविनायक दवाखान्यात नुकतीच पुणे येथील प्रसिद्ध डॉक्टर राकेश नेवे, डॉ.भगवान पवार,डॉ.संध्या खवटे, डॉ.संपदा खवटे यांनी यशस्वी शस्ञक्रिया करत ती गाठ काढली.

यावेळी वरदविनायकचे डॉ.मनोज भोसले, डॉ.सुनिल पवार, डॉ.निलेश कटक दौर,डॉ.फडके बापुराव यांनी तज्ञ डॉक्टरांच्या पथकाला सहकार्य केले.या टयुमरचे वजन सुमारे दहा किलो असुन रुग्ण शुद्धीवर आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.तसेच अशा प्रकारची शस्ञक्रिया ग्रामीण भागातील प्रथमच सर्वात मोठी शस्ञक्रिया असल्याचेही त्यांनी सांगितले.रुग्णावर पुढील उपचार वरदविनायक हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली सुरु आहे.


Image may contain: 7 people, people smiling, people standing

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या