सादलगावमधील तक्रार पत्रामुळे उपसरपंच निवड लांबली

सादलगाव, ता. 3 जुलै 2018 (संपत कारकूड): येथे गुरुवारी (ता. 28) घेतलेल्या उपसरपंच निवडणुक कार्यक्रमात ग्रामपंचायतीस आलेल्या एका तक्रार पत्रामुळे उपसरपंच निवड पुढे ढकलण्यात आली असून, ग्रामपंचायतीस दिलेल्या पत्राबाबत गावामध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

गायरानाच्या मुद्यावरुन येथील दोन गटांतील राजकारण अत्यंत टोकाला पोचले असून, त्यातील एक नमुना नुकताच पुढे आला आहे. गायरान मुद्यावरुन एका महिला सदस्यांचे गायरान अतिक्रमणाचे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे. आयुक्ताकडील निकाला लागल्यानंतर या निकालाच्या विरोधात रिटपिटिशनद्वारे उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. यावरील अंतिम निकाल अद्याप बाकी असतानाच ग्रामपंचायतीकडे आलेल्या लेखी तक्रार पत्राने निवडणुक निर्णय अधिकारी तथा गावच्या महिला सरपंच व प्रभारी ग्रामसेवकांनी निवड प्रक्रिया लांबविल्याचा निर्णय चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे सदस्य देविदास होळकर, अविनाश पवार, अशोक लवांडे व निर्मलाताई केसवड, रुक्मीणीबाई अडसूळ यांनी सांगितले असून, उच्च न्यायालयाचा कोणताही आदेष नसताना केवळ ग्रामपंचायतीकडे आलेल्या लेखी तक्रारीमुळे कोर्टाचा अवमान कसा होऊ शकतो? हा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे या विरोधात मुख्य निवडणुक निर्णय अधिकारी, पुणे यांच्याकडे न्याय मागण्यात येणार असल्याचे वरील सर्व सदस्यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या