शिरसगाव काटा येथे कृषिदिन उत्साहात साजरा

Image may contain: 3 people, people standing and outdoor
शिरसगाव काटा, ता. ४ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिरसगाव काटा येथे कृषिदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित साईकृपा कृषी महाविद्यालय घारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शिरसगाव काटा गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदिन,वृक्षदिंडी व वृक्षलागवड करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना वृक्षारोपणचे  महत्त्व सांगितले. कृषि सहाययक जगताप यांनी शेती आणि शेतकऱ्यांना झाडापासून होणारे फायदे पटवून दिले तसेच नरेंद्र माने यांनी विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना प्रत्येकाच्या घरी वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर निंबाळकर सर यांनी कृषिदिनाची माहिती दिली.

या प्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा.दिपक नवसुपे व कार्यक्रम समन्यवक म्हणून प्रा.शितल लोंढे,मुख्याध्यापक संतोष कटारिया, सरपंच सतिष चव्हाण, कृषि सहायक सतीश जगताप, ग्रामसेवक रमेश चांदगुडे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र माने,न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सचिन आवारे,कैलास गारगोटे,लक्ष्मण लंघे, पोलीस पाटील शीतल गायकवाड, कृषिदूत तुषार घोडे, राहुल कोल्हे, निखिल राऊत, कासार वैभव, सुजित टुले, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिदूत शेखर खाटीक यांनी केले तर  आभार कृषिदूत निखिल रणदिवे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या