सादलगावातून श्री बापदेव महाराजांच्या दिंडयाचे प्रस्थान

Image may contain: one or more people and crowd
सादलगाव, ता. 11 जुलै 2018 (संपत कारकूड) : येथील ग्रामदैवत श्री बापदेव महाराज यांच्या दोन वेगवेगळया दिंडया साहेळयाचे प्रस्थान सोमवार व मंगळवारी झाले. दिंडीमधील श्री संत बापदेव महाराज दिंडीचे हे प्रथम वर्षे असून दिंडीसाठी आकर्षक रथाचा समावेश करण्यात आला आहे.

प्रस्थानदिनी दिंडीमधील नवीन रथाचे पुजन माजी आमदार श्री. अशोक पवार, नानासाहेब फडके यांच्या हस्ते करण्यात आले. दिंडीला शुभेच्छा देताना श्री. पवार म्हणाले की. सध्या तालुक्यामध्ये मोठा पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, तेव्हा पांडुरंगाकडे मोठा पाऊस पडण्याचे साकडे त्यांच्याकडून घालण्यात आले.
 
दोन्ही दिंडयांमध्ये प्रस्थानापुर्वी बापुजीबुआ महाराज पुजन, पांडुरंग पुजन, विणापुजन, टाळ मृदुंग तसेच पताका पुजन व रथ पुजन करण्यात आले. ठिकठिकाणी होणाऱया मुक्कामाच्या ठिकाणी सर्व सेवांचे नियोजन करण्यात आले असून, देणगीदारांनी व भाविकांनी मोठया उत्साहाने आपआपल्या सेवा वाटून घेतल्या आहेत. दिंडयामध्ये हातवळण (ता.दौंड) येथील ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला असून, या गावामध्येही श्री बापदेव महाराज हेच ग्रामदैवत आहे. गावातील महिला तसेच लहान मुले आणि वयोवृध्दांनी तसेच ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या