स्वाभिमानी चे सोमवार पासुन दुधदरासाठी आंदोलन

मांडवगण फराटा,ता.१४ जुलै २०१८(प्रतिनीधी) : मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथे (दि.16) पासून स्वाभिमानी शेतकरी संघटना दुधाच्या दराबाबत आंदोलन सुरू करणार आहे.त्यामुळे दूध संकलन करणारया दूध डेअरी व रस्त्यावरून वाहतूक करणारे दूध टँकर यांनी 16 जुलै पासून दूध वाहतूक थांबवावी असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य  कार्यकारीणी सदस्य अशोक शितोळे,बाबासाहेब फराटे, बाळासाहेब भोयटे, प्रकाश जगताप यांनी दिला आहे.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य  कार्यकारीणी सदस्य अशोक शितोळे म्हणाले की शेतकरयांच्या शेतीच्या पिकांना योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग हा जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करत आहेत पण त्या दुधाला देखील म्हणावा असा बाजारभाव शेतकरयांना मिळत नाही.गार्इ म्हशींना लागणारा चारा देखील आता दुधाच्या दरापेक्षा महाग झाला आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग हा कर्जबाजारी होत चालला आहे या परीसरामध्ये अदयपी पाउस झाला नसून जनावरांच्या चारयाचाही प्रश्न शेतकरयांना भेडसावत आहे.शासनाने दुध निर्यातीसाठी दुधपावडरला जे अनुदान जाहीर केले आहे ते दुधप्रकल्पवाल्यांचाच फायदा करणार शेतकरयांना मात्र त्याचा उपयोग होणार नाही दुध उत्पादक शेतकरयांना प्रति लिटर किमान 27 रू बाजारभाव शासनाने जाहीर केला असता तर सामान्य दुध उत्पादक शेतकरयाच्या पदरी किमान दोन पैसे तरी शिल्लक राहीले असते पण या शासनाच्या अडमुठे धोरणामुळे शेतकरयांना आता आपले हक्काचे पैसे मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाबासाहेब फराटे म्हणाले की,सरकार मात्र शेतकरयांची दिशाभूल करत आहे.कर्जमाफीची घोषणा देउन सरकार मोकळे झाले पण मात्र किती शेतकरयांना याचा लाभ झाला याचा सरकारनेच अभ्यास करणे गरजेचे आहे. साखरेला बरयापैकी बाजारभाव मिळू लागला आहे पण कारखान्याने एफ आर पी पूर्ण केली नाही,त्यामुळे कर्ज भरणे दूरच पण शेतीला खते, पाणी,बियाणे,पेरणी, लागवड करणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे फराटे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या