निमगाव म्हाळुंगीत दिंडी सोहळा (फोटो फीचर)

Image may contain: one or more people, people on stage, crowd, sky and outdoor
निमगाव म्हाळुंगी , ता. 15 जुलै 2018:  येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी (ता. 14) आषाढी वारीनिमित्त विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी व पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढली. या वेळी पारंपरिक पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर नाचत गावातून दिंडीची मिरवणूक काढली.

"झाडे लावा, झाडे जगवा' अशा घोषणा देत पर्यावरणाविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. या वेळी विद्यार्थ्यांच्या हातात विविध झाडे देण्यात आली होती. पताका व आकर्षक पोशाख परिधान केलेले विद्यार्थी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होते. शाळेच्या प्रांगणात फुगडी व पारंपरिक खेळ झाले. प्राचार्य दिलीप पवार, हरिदास आटोळे, रमेश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सरपंच चांगुणा काळे, रावसाहेब करपे, दशरथ लांडगे, कांतिलाल टाकळकर, काळूराम चव्हाण, रामचंद्र काळे, रखमाबाई चव्हाण आदी सहभागी झाले होते. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी दिंडी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
Image may contain: 9 people, people standing, crowd and outdoor

Image may contain: 9 people, people standing and outdoor

Image may contain: 12 people, people smiling, crowd and outdoor

Image may contain: 2 people, people walking, people standing, crowd and outdoor

Image may contain: 8 people, people smiling, people standing, crowd and outdoor

Image may contain: 1 person, crowd and outdoor

Image may contain: 9 people, people standing, crowd and outdoor

Image may contain: 1 person, smiling, standing, crowd and outdoor

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या