गठई कामगारांना पीच स्टॉलसाठी परवानगी द्या
शिरुर,ता.१८ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिरुर शहरातील गठई कामगारांना पीच स्टॉल परवान्यासाठी जिल्हयाबरोबर शिरुर शहरात नगरपालिका हद्दीत परवानगी द्या अशी मागणी संत रोहिदास जयंती उत्सव समितीच्या वतीने शिरुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अॅलिस पोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, शिरुर शहरात गठई कामगार असुन हे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला बसुन उन,वारा,पाउस सहन करुन आपली सेवा देतात.नगरपरिषदेच्या हद्दीत गठई कामगारांना बैठे व स्टॉल परवाना देणेबाबत महाराष्ट्र शासनाने २००० साली आदेश दिला आहे.तसेच रस्त्याच्या जागेत अथवा चौकात पीच परवाने देण्याची तरतुद केली आहे.माञ शासनाचा आदेश असुनही नगरपरिषद हद्दीतील चर्मकार गठई कामगार यापासुन वंचित राहत आहे.
तरी या आदेशाची अंमलबजावणी करुन शिरुर नगरपरिद हद्दीतील गठई कामगारांना पीच व स्टॉल साठी परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.या मागण्यांचे निवेदन शिरुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अॅलिस पोरे यांच्याकडे देण्यात आले. याप्रसंगी तुषार वेताळ,सुनिल साळी,विष्णु वेताळ,भाउ जाधव,राजेश वेताळ आदी उपस्थित होते.