उल्लेखनीय कार्य करणाऱया पञकारांचा सन्मान (Video)

Image may contain: 14 people, people smiling, people standingImage may contain: 14 people, people smiling, people standing
शिरुर,ता.२१ जुलै २०१८ (प्रतिनीधी) : पञकार संघातर्फे उल्लेखनीय बातमीदारी करणा-या पञकार मुकुंद ढोबळे, तेजस फडके, प्रविण गायकवाड, शेरखान शेख, भाउसाहेब खपके यांना आदर्श पञकार पुरस्कार देण्यात आला

या वेळी बोलताना माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले कि, शिरूर तालुक्याला पुर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळखले जायचे. परंतु कालांतराने या तालुक्याचे चित्र बदलुन गेले  व नव्वद टक्के तालुका सिंचनाखाली आणला.तालुक्यात औद्योगिककरण मोठ्या प्रमाणावर झाले. यामुळे तालुका सुजलाम सूफलाम झाला.शिरुर तालुक्याच्या सर्वांगिन विकासात पत्रकारांचा खारीचा वाटा असल्याचे ते म्हणाले.

यावेळी बोलताना जिल्हापरिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले कि, शिरूर तालुक्यातील पञकार बांधवांच्या प्रत्येक अडचणी समजुन पञकरांच्या मदतीसाठी मी नेहमी  तयार असल्याचे आश्वासन कंद यांनी यावेळी दिली.या प्रसंगी विविध क्षेञात उल्लेखनिय कार्य करणा-या सामजिक कार्याबद्दल बाबुशेठ बोरा समाजरत्न,डॉ.अर्चना व डॉ.सतीश आंधळे यांना मुलगी वाचवा व डॉक्टर क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल  डॉक्टररत्न, बबन चित्रपट अभिनेते भाऊसाहेब शिंदे यांना कलारत्न , अभिनेत्री गायत्री जाधव कलारत्न , निलेश खोडसकर यांना कार्यक्षम अधिकारी, व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

यावेळी शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले,पोलीस निरीक्षक कैलास घोडके, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील,सिताराम लांडगे,नगरसेविका संगीता मल्लाव, दक्षता समितीच्या शोभना पाचंगे, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महेबुब सय्यद, ओबिसीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लांडे पाटिल, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, सिनेकलाकार रुपेश बोरुडे, आयूब शेख, अतुल थोरवे, प्रविण बामणे, माजी नगरसेविका माया गायकवाड, खरेदी विक्री संघाचे आबासाहेब सोनवणे, भाजपा शहराध्यक्ष केशव लोखंडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे,सचिव अर्जुन बढे,शहराध्यक्ष आप्पासाहेब ढवळे,कोषाध्यक्ष जालिंदर आदक,कायदेशीर सल्लागार अॅड.संजय येवले, बबन वाघमारे, मंदार तकटे, संतोष गुंजवटे, प्रविण गायकवाड, प्रमोल कुसेकर, गजानन गावडे आदिंनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या