शिरुरला दिवसभर कडकडीत पाळला बंद

Image may contain: outdoorशिरुर,ता.२५ जुलै २०१८(प्रतिनीधी): सकल मराठा समाजातील काकासाहेब शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जलसमाधी घेतल्यानंतर या घटनेचे शिरुर शहरात पडसाद उमटले.शिरुर शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने शिरुर बंदचे आवाहन करण्यात आले होते.त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.तर मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्या संदर्भात शासनाने तातडीने सकारात्मक पाऊले उचलावीत अशी मागणी शिरुर शहरातील सकल मराठा समाजाचा वतीने निवेदनाद्वारे केली.

शिरुरच्या बाजारपेठेत व्यापा-यांनी आपआपली दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला.मंगळवार(दि.२४) रोजी सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने संपुर्ण शिरुर शहरात रस्त्यावर उतरुन बंदचे आवाहन केले होते.संपुर्ण शहरात मोर्चाद्वारे हे आवाहन करण्यात आले होते.याला व्यापा-यांनीही चांगला प्रतिसाद दिला.यावेळी शिरुर शहरातील मुख्य बाजारपेठ,पाचकंदिल चौक,रामआळी,सरदार पेठ,हलवाई चौक,सुभाष चौक,कापड बाजार,मारुती आळी,निर्माण प्लाझा आदी ठिकाणी या मोर्चेकरांनी शांततेत बंदचे आवाहन केले.यावेळी शिरुर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.या बंद मध्ये अत्यावश्यक समजल्या जाणा-या मेडिकल व दवाखाने यांना वगळण्यात आले होते.या मोर्चाची सांगता  शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीत सभा घेउन सांगता करण्यात आली.या बंदसाठी शिरुर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कैलास घोडके,सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे,भगवान पालवे,किरण घोंगडे व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्या संदर्भात शासनाने तातडीने सकारात्मक पाऊले उचलावित अशी मागणी शिरुर शहरातील सकल मराठा समाजाचा वतीने निवेदनाद्वारे केली आहे.यासंदर्भात शिरुरचे नायब तहसिलदार शफिक शेख यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्ह्टले आहे की गेल्या काही दिवसापासून मराठा समाज आरक्षण संदर्भात लोकशाही मार्गाने शांततापुर्ण आंदोलन करित आहे काल सोमवार दिनांक २३ जुलै रोजी मराठा आंदोलना दरम्यान  काकासाहेब शिंदे या युवकाने मराठा आरक्षणाचा प्रश्नी जलसमाधी घेतली. शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.दरम्यान शासनाने मराठा आरक्षण व इतर प्रश्न तातडीने सोडावेत असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर,कॉग्रेस आय चे शहराध्यक्ष किरण आंबेकर,शिवसेवा मंडळाचे विश्वस्त ॲड.सुभाष पवार, माजी उपनगराध्यक्ष दिलिप करंजुले,कॉग्रेस आयचे दादा चौधरी,जयसिंगराव कर्डीले, माजी नगराध्यक्षा अलका सरोदे, डॉ नारायण सरोदे, मातोश्री प्रतिष्ठानचे सचिव प्रा.सतिश धुमाळ, सुरेश नाना कदम, उदय शिंदे, बिजवंत शिंदे, ढोकसांगवी चे माजी सरपंच गीताराम  पाचंगे, रामलिंगचे माजी सरपंच  गणेश घाडगे, रामभाऊ शेटे, बाळासाहेब गायकवाड, इंद्रभान ओव्हाळ, ॲड प्रताप शिंदे, ॲड सयाजी गायकवाड, ॲड सतिश गवारी, ॲड संजय ढमढेरे, ॲड .रवींद्र खांडरे, नम्रता गवारी, कैलास वारे, डॉ विक्रम घावटे, बाबाजी गलांडे, डॉ सुभाष गवारी, मराठा महासंघाच्या वैशाली गायकवाड़, मुद्रक संघटनेचे बाबूराव पाचंगे, सुदाम चव्हाण आदीच्या सह्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या