सादलगावच्या बंधा-यावरुन दुचाकीस्वार गेला वाहून(video)

Image may contain: one or more people, people standing, sky, outdoor and nature

सादलगाव, ता. २५ जुलै २०१८ (संपत कारकूड) : सादलगाव (ता. शिरुर) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यावरून दुचाकीस्वार नदी पात्रात वाहून गेल्याची घटना मंगळवारी (ता. 24) घडली.  राजेंद्र नारायण दिवेकर (वय ५५) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.


सविस्तर असे कि, सादलगाव (ता. शिरुर) येथे कोल्हापुर पद्धतीचा बंधारा असून या बंधा-याला संरक्षक कठडे कुठेच नाही. सध्या भीमानदीला पाण्याचा विसर्ग मोठा होत असल्याने भिमा नदी पाञ दुथडी भरुन वाहत आहे. मंगळवारी (ता. २५) सायंकाळच्या सुमारास दिवेकर हे या बंधा-यावरुन जात असताना तोल जाउन दुचाकीसह पाण्यात पडले. परंतु पाण्याचा प्रवाह मोठा वेगाने असल्याने स्वत:ला वाचवू शकले नाही.

घटनेची माहिती कळताच स्थानिक गावकऱ्यांनी तरुणांसह नदी पात्रात दिवेकर यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता ते  मिळून आले  नाहीत. सध्या भीमा नदी दुथडी भरून वाहत असल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रत्यक्षदर्षी जागेवर घेतलेल्या माहितीनुसार, दिवेकर हे हातवळण येथे ट्रॅक्टर डायव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळते. रात्री उशिरा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येवून प्रत्यक्ष जागेवर मोटारसायकल काढण्याचा प्रयत्न केला. तसेच शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीसांनीही घटनास्थळी येवून घटनास्थळाची पाहणी केली आहे.

यापूर्वीही या बंधाऱ्यावर अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या आहेत. या बंधाऱ्यावरून दुचाकीसह इतर अनेक वाहनांची वर्दळ असते. या बंधाऱ्यावर कठडे बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या