समतोल संत साहित्य लेखनाची आवश्यकता : श्रीपाल सबनीस

Image may contain: 8 people, people standingनिमोणे, ता. २५ जुलै २०१८ (तेजस फडके) : समतोल संत साहित्य लेखनाची नितांत आवश्यकता असल्याचे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सपनीस यांनी व्यक्त केले.

निमोणे(ता.शिरुर) येथील डॉ. राजेंद्र थोरात लिखित 'वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी' या समीक्षा ग्रंथाचे अ.भा.सा.संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

डॉ. राजेंद्र थोरात यांच्या 'वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी' या ग्रंथावर भाष्य करताना श्रीपाल सबनीस म्हणाले,"समतोल बुद्धिवादी परिप्रेक्षातून डॉ. राजेंद्र थोरात यांनी लिखाण केले असून त्यांचे संत वाडमयीन निरीक्षण वाखाणण्याजोगे आहे.संत साहित्याची समाजाला गरज आहे व यापुढेही असेल मात्र सारासार विवेक बुद्धीने ते तोलून पाहणे गरजेचे आहे.जातीय व धार्मिक अस्मिता टोकदार होत असताना वारकरी साहित्याचा समतोल विचार समाज जोडण्याचे कार्य करत आहे.वारकरी साहित्यावर अधिकाधिक डोळस लेखनाची आवश्यकता आहे.

संत साहित्याचे अभ्यासक वि.दा.पिंगळे व सचिन पवार यांनी ग्रंथाच्या अंतरंगावर भाष्य केले.भाष्य करतांना सचिन पवार म्हणाले,'डॉ. राजेंद्र थोरात यांनी आपले पीएच.डी संशोधन पुस्तकरूपात सोप्या भाषेत मांडले आहे.ख-या अर्थाने त्यांनी आपल्या संशोधनाचे 'सोशल ऑडिट' केले आहे.

प्रास्ताविकातून आपली भूमिका विशद करतांना संस्कृती प्रकाशनाच्या संचालिका व म.सा.प.च्या कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार यांनी सध्याच्या काळात वारकरी साहित्याची आवश्यकता स्पष्ट केली.ग्रंथाचे लेखक डाॅ राजेंद्र थोरात यांनी पुस्तक लेखनामागील उद्देश स्पष्ट करतांना सदर ग्रंथ वारकरी साहित्याच्या अभ्यासकांना तसेच संशोधक समीक्षकांना व वाचकांना उपयुक्त ठरेल असे स्पष्ट केले.

याप्रसंगी मा. रवींद्र माळवदकर, प्राचार्य भोईटे उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. पांडुरंग कंद यांनी केले तर आभार डॉ. स्वप्नील गायकवाड यांनी मानले. आषाढी एकादशीमुळे वारक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या