सादलगावमधील बेपत्ता व्यक्तीचा शोध लागेना (Video)

Image may contain: one or more people, outdoor, water and nature
सादलगाव, ता. २७ जुलै २०१८ (संपत कारकुड) : सादलगाव (ता.शिरुर) येथील बंधा-यावरुन पाण्यात पडून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा अद्यापही शोध लागला नसुन बचावपथकामार्फत शोध सुरु आहे.


सविस्तर असे कि, मंगळवारी (ता. २५) रोजी सायंकाळच्या सुमारास राजेंद्र  दिवेकर हे या बंधा-यावरुन जात असताना तोल जाउन दुचाकीसह पाण्यात पडले. परंतु, पाण्याचा प्रवाह मोठा वेगाने असल्याने त्यात त्यांचा निभाव लागला नाही. व बेपत्ता झाले. यानंतर स्थानिकांनी शोधण्यास सुरुवात केली परंतु तरीदेखिल यश मिळत नव्हते.

अखेर गुरुवार (दि.२६) रोजी उशिरा आपत्कालीन बचावपथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बचावपथकाने बोटीच्या साहाय्याने भिमानदीपाञात शोध सुरु केला. मंगळवारी उशिरापर्यंत शोध कार्य सुरु होते. परंतु अंधार झाल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या.दरम्यान घटनास्थळी शिरुर पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी भेट दिली. भिमानदीचे पाञ हे सर्वात मोठं पाञ असुन नदीपाञात शोध घेणं हे बचावपथकाला जिकिरीचे काम असुन शासकिय यंञणा उशिरा दाखल झाल्याबद्दल ग्रामस्थांनी गुरुवारी नाराजी व्यक्त केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या