गोलेगावला कारगिल विजय दिनानिमित्त अभिवादन (Video)

गोलेगाव, ता. २७ जुलै २०१८ (प्रतिनीधी) : गोलेगाव (ता.शिरुर) येथे कारगिल विजय दिनानिमित्त नागरिकांकडुन शहिदांना अभिवादन करण्यात आले.

गोलेगाव (ता.शिरुर) येथे कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले व मेनबत्त्या पेटवुन शहिदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शोभना पाचंगे, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष संभाजी कर्डिले,वर्षा काळे आदींनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे सुञसंचालन संजय बारवकर यांनी केले.राजेंद्र कटके यांनी आभार मानले.

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष रविकांत वर्पे,गणेश सटाणे, दिलीप पडवळ,अल्पसंख्याक आघाडीचे राजु शेख, बबन वाखारे, संतोष वर्पे, सरपंच विठ्ठल घावटे यांसह कॅप्टन विठ्ठल वराळ, कॅप्टन कटके, दत्तु वाखारे, माउली कारंडे, बाळासाहेब शेवाळे, लक्ष्मण पडवळ आदी माजी सैनिक तर मराठा महासंघाच्या शहाध्यक्षा वैशाली गायकवाड, जिजाताई दुर्गे, शैलजा दुर्गे व गोलेगाव ग्रामस्थ  उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या