'एकात्मिक फलोत्पादन'ची शुक्रवारी सोडत होणार

शिरुर,ता.१ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत विविध घटकांसाठी अॉनलाईन अर्ज नोंदणी केलेल्या अर्जांची लॉटरी पद्धतीने सोडत शुक्रवार(दि.३) रोजी  होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संजय पिंगट यांनी दिली.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राज्यामध्ये सन २०१८-१९ पासुन राबविण्यात येत आहे.यामध्ये विविध घटकांसाठी अॉनलाइन अर्जांची (दि.३० जुन) पर्यंत शेतक-यांनी नोंदणी केलेली आहे.शिरुर तालुक्यात सुमारे २३८८ शेतक-यांनी अर्ज नोंदणी केली असुन या अर्जांची लॉटरी पद्धतीने शिरुर मधील नवीन प्रशासकिय इमारतीत (दि.३) रोजी सोडत काढण्यात येणार असुन ज्या शेतक-यांनी अॉनलाईन अर्ज भरले आहेत,त्या शेतक-यांनी उपस्थित राहावे आवाहन पिंगट यांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या