शिरुरला मोर्चा दरम्यान कडक बंदोबस्त राहणार

Image may contain: text
शिरुर, ता.१ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : शिरुरला आज बुधवार (दि. १) रोजी आयोजित केलेल्या मराठा मोर्चा दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

सोशल मिडियावर मराठा आरक्षण व धनगर आरक्षण, वीज बील व संपूर्ण कर्जमाफीसाठी 'चलो शिरुर चलो शिरुर चलो शिरुर' अशा आशयाचा संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असुन या मेसेजनुसार बुधवार (दि.१) रोजी, वडगांव रासाई ते शिरूर पायी मोर्चा, व तालुक्यात विविध ठिकाणी जमा होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारी चार वाजता शिरुर तहसिल कार्यालय या ठिकानी निवेदन देउन या मोर्चाचा समारोप होणार आहे.

चाकण येथे मोर्चादरम्यान हिंसक घटना घडल्याच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडुन खबरदारी घेण्यात येणार आहे.एसटी प्रशासनानेही एसटी सेवा तात्पुरती बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे. पोलीसांच्यावतीने कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या