शिरुरच्या मोर्चात शिस्त अन् एकोप्याचे दर्शन (Video)

Image may contain: text

शिरुर
, ता.२ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) :
मराठा समाजाला व धनगर समाजाला आरक्षण मिळावे तसेच विजबिल माफ व्हावे या मागणीसाठी काढलेल्या पदयाञा मोर्चाला शिरुर तालुक्यात व शहरात उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.

मराठा समाजाच्यावतीने काढलेल्या मोर्चाची सुरुवात वडगाव रासाई (ता.शिरुर) येथुन करण्यात आली. सादलगांव, मांडवगण फराटा, गणेगांव दुमाला, तांदळी, बाभुळसर या गावांनी सहभाग घेतला.त्यानंतर आंधळगाव फाटा न्हावरे मार्गे पायी चालत हा मोर्चा आंबळे, करडे या गावांहुन न्हावरा फाटा या ठिकाणी आला. दरम्यान ठिकठिकठिकाणी पायी चालणा-या मोर्चेक-यांना चहा, पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. न्हावरे फाटा या ठिकाणी आल्यानंतर मोर्चात शेकडो लोक सहभागी झाले होते. त्याचबरोबर दुचाकी रॅलीही काढण्यात आली होती.एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे,धनगर आरक्षण मिळालंच पाहिजे या घोषणांनी सायंकाळी शिरुर शहर दुमदुमुन गेले होते.शिरुर बाजारसमिती येथे छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शिरुर तहसिल कार्यालय या ठिकाणी सभा घेण्यात आली.या वेळी अनेकांची भाषणे झाली.यावेळी शिरुर चे तहसिलदार रणजित भोसले यांना मागण्यांसंदर्भात महिलांच्याहस्ते निवेदन देण्यात आले.

दरम्यान शिरुर शहरात संपुर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.एस-टी महामंडळाने खबरदारी म्हणुन शिरुर बसआगाराने सकाळी सात वाजलेपासुन दिवसभर एसटीच्या फे-या रद्द केल्या होत्या.शिरुर शहरातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलीसांनी अनुचित प्रकार घडु नये म्हणुन सकाळी सात वाजलेपासुन शिरुर शहर व परिसरात कडेकोड बंदोबस्त ठेवला होता. या बंदोबस्तासाठी पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, भागवत मुंढे, कैलास घोडके, सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या, दंगल नियंञण पथक, होमगार्ड असा मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला होता.

या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, रंजन झांबरे, कुंडलिक शितोळे, बाजारसमितीचे सभापती शसिकांत दसगुडे, संतोष रणदिवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवि काळे, जि.प.सदस्य राजेंद्र जगदाळे, जि.प.सदस्य कुसुम मांढरे, पांडुरंग थोरात, विजेंद्र गद्रे, नरेंद्र माने, प्रविण चोरडिया, बंडु जाधव, जाकिरखान पठाण, रविंद्र ढोबळे, मुजफ्फर कुरेशी, अॅड.रविंद्र खांडरे, अॅड. संजय ढमढेरे, अॅड. किरण आंबेकर, नामदेव जाधव, सिमा फराटे, पल्लवी शहा, लतिका वराळे, सुदाम चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळी सात वाजता वडगाव रासाई येथुन पायी निघालेला मोर्चा सायंकाळी पाच वाजता सुमारे ४० किलोमीटर अंतर पायी चालत शिरुर मध्ये दाखल झाला. यावेळी शिरुर शहर मुस्लिम समाजाच्यावतीने शिरुर नगरपालिकेसमोर मोर्चेकरांना पाण्याच्या बाटल्या, फळे व बिस्किटे वाटप करण्यात आली. चाकण शहरात अनुचित प्रकार घडल्याने या पार्श्वभुमीवर शिरुर शहरात चौका-चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळपासुन शिरुर शहरात कडकडित बंद पाळण्यात आला होता. यामुळे शिरुर शहराला एकप्रकारे छावणीचे स्वरुप आले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या