अन् दयानंद गावडेंनी जिंकली तरुणांची मने... (Video)

शिरुर, ता.२ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : जेव्हा मोर्चात तरुण थोडेस आक्रमक होउ लागतात तेव्हा स्वत: ३४ किलोमीटर पायी चालत येउनही तितक्याच तडफेने मोर्चातील तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी विनंती केल्याने तरुणांनीही संयम राखत शांततेत मोर्चा पार पाडला.

मराठा समाजाला व धनगर समाजाला आरक्षण मिळावे तसेच विजबिल माफ व्हावे या मागणीसाठी वडगाव रासाई ते शिरुर असा मोर्चा काढण्यात आला होता.हा मोर्चा कुरुळी,आंधळगाव फाटा, न्हावरा,आंबळे, करडे, न्हावरे फाटा या मार्गे शिरुर मध्ये धडकला.शिरुर शहरात प्रवेश करत असताना सहभागी मोर्चेकरांची संख्या लक्षणीय होती.यात असंख्य युवक हातात झेंडे घेउन घोषणा देत असल्याचे चिञ होते.शहरात प्रवेश करत असताना दुचाकी वाहने मागे थोपवणे व मोर्चेक-यांना पुढे जाणे गरजेचे होते.यावेळी बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे, रवि काळे यांनी दुचाकीवरील तरुणांना विनंती केली परंतु तरी मार्ग निघत नव्हता.थोडे तणावाचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तरुणांना हात जोडुन दुचाकी मागुन घेउन येण्याची विनंती केली व तरुणांनीही ती मान्य करत शहरात शांततेत मोर्चा नेण्यात आला.

सकाळी ९ वाजलेपासुन पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस, शिरुर व पुणे ग्रामीण चे पोलीस अधिकारी, कर्मचारी पायी चालत होते.चाकण च्या घटनेनंतर शिरुर शहरात मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन दयानंद गावडे स्वत: मोर्चात अग्रभागी होते.त्यामुळे कुठेही वाहतुक खोळबंली नाही.सकाळपासुन ३४ किलोमीटर स्वत: पायी चालुनही सायंकाळी मोर्चा संपेपर्यंत तितक्याच तडफेने गावडेंनी मोर्चातील हालचालींवर लक्ष ठेवले होते. सायंकाळी शांततेत मोर्चा पार पडला. गावडेंच्या कामात पुर्णपणे झोकुन देण्याच्या या वृत्तीने अखेर शिरुरकरांची मने जिंकली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या