वडगाव रासाईत पाण्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Image may contain: 1 person, sky, tree, outdoor, nature and water
वडगाव रासाई, ता.३ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : वडगाव रासाई (ता.शिरुर) येथील भिमानदी पाञात पाण्यात बुडुन युवकाचा बुडुन  दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना गुरुवार(दि.२) रोजी घडली.

याबाबत महेश राजेंद्र शेलार (रा. वडगाव रासाई) यांनी फिर्याद दिली आहे.तर या घटनेत ऋतिक अरुण इंगळे (वय. १८, रा.वडगाव रासाई) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार(दि.२) रोजी दुपारी तीन वाजणेच्या सुमारास महेश शेलार व ऋतिक इंगळे हे दोघे वडगाव रासाई(ता.शिरुर) येथील भिमानदी पाञात असलेल्या रासाई देवी मंदिराच्या गाभा-यात साचत असलेले पाणी बाहेर काढण्यासाठी गेले होते. महेश शेलार हा गाभा-याच्या भिंतीला ड्रिल मशिन च्या साहाय्याने छिद्र पाडत होता. तर ऋतिक हा होडी धरुन बाहेर थांबलेला होता.दरम्यान ऋतिकच्या हातुन होडी निसटल्याने त्याने गाभा-यातील महेश यास हाक मारली. महेश याने ऋतिक यास पाण्यात उतरु न देता नाव पकडण्यासाठी स्वत: नदी पाञात उडी मारली. त्यावेळी उभा असलेल्या ऋतिक ने कपडे काढुन खोल पाण्यात उडी मारली व होडीकडे पोहत येउ लागला.माञ पाणी खोल असल्याने व पाण्याला वेग असल्याने ऋतिक पाण्यात बुडु लागला. त्याला वाचविण्यासाठी महेशने होडीतुन पाण्यात उडी टाकली व बुडत असलेल्या ऋतिककडे पोहत जाउ लागला.माञ तत्पुर्वी ऋतिक पाण्यात बुडाला होता.

त्यानंतर महेशने मदतीसाठी जोरजोरात आरडा-ओरडा केला.यावेळी जवळच असणा-या मच्छिमारांनी व गावातील पोहणा-या मुलांनी नदीपाञात ऋतिकचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, घटनास्थळापासुन सुमारे दोनशे फुट अंतरावर ऋतिक बेशुद्धावस्थेत मिळुन आला. त्यास तत्काळ जवळच्या खासगी दवाखान्यात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासणीअंती मयत घोषित केले.

घटनेची माहिती कळताच मांडवगण पोलीस चौकीचे पोलीस हवालदार श्रावण गुपचे, आबासाहेब जगदाळे, पोलीस मिञ अक्षय काळे यांनी भेट देउन घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनास न्हावरे येथील प्राथमिक रुग्णालयात पाठविला. या घटनेतील दुर्दैवी मृत्यु झालेला ऋतिक हा वडगाव रासाई येथील छञपती विद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिकत होता. त्याची घरची परिस्थिती बेताची असुन त्याच्या झालेल्या दुर्दैवी मृत्युमुळे वडगाव रासाई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास मांडवगण पोलीस चौकीचे जमादार आबासाहेब जगदाळे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या