गावरान गायीचे दुध शरीराला पोषकः सुरेंद्र देव (Video)

Image may contain: 4 people, people sitting
दहिवडी, ता. 5 ऑगस्ट (तेजस फडके): आपल्या देशात प्रत्येक राज्यात विविध प्रकारच्या देशी गायीच्या जाती असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील खिल्लार तसेच इतर जातींच्या गावरान गायींचा समावेश आहे. गावरान गायीचे दुध शरीराला पोषक असून, त्या दुधापासून तयार होणाऱया दही, ताक, तुपाला मोठया मागणी आहे.


अनेकजण जास्त पैसे मिळवण्याचा हेतुने आपण होस्टेन, जर्सी गायी पाळताना दिसतात. यामुळे शेतकऱ्यांच्या दारातून देशी गावरान गाय हद्दपार झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळते, असे मत दहिवडी (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी सुरेंद्र देव यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना व्यक्त केले.

गावरान खिल्लार गाय आपल्याकडे पवित्र मानली जाते. गायीचे गोमुत्र अनेक वेळा औषध म्हणून वापरले जाते. खिल्लार गायींच्या दुधापासून अनेक प्रकारचे फायदे आहेत. परंतु, आजकाल शेतकरी गावरान गाय पाळायला टाळाटाळ करतात. भविष्यात याची मोठी किंमत आपल्याला शारीरिक व्याधीच्या रुपाने मोजावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने देशी गावरान गाय पाळावी. तसेच विषमुक्त अन्न पिकविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही श्री. देव यांनी संकेतस्थळाशी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या