शिरुर तालुक्यात ठिकठिकाणी पोलीसांचा 'रुटमार्च'(video)

शिरुर,७ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : सकल मराठा समाजाच्या(दि.९) रोजी महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभुमीवर शिरुर शहर, मांडवगण फराटा गावात पोलीसांनी पथसंचलन केले.
शिरुर पोलीस स्टेशन पासुन निघालेला पोलीसांचा ताफा शिरुर शहरातील संपुर्ण बाजारपेठ,राम आळी, कापड बाजार,आडत बाजार,डंबेनाला,मुंबई बाजार,कामाठीपुरा,पाबळफाटा मार्गे एसटी बसस्थानक,नगरपालिका अशा मार्गे संपुर्ण शिरुर शहरात पथसंचलन केले.

यानंतर शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथेही संचलन करण्यात आले.या पथसंचलनात रॅपिड अॅक्शन फोर्सचे चार अधिकारी,९२ कर्मचारी,शिरुर पोलीस स्टेशनचे पाच अधिकारी,१८ कर्मचारी,८ होमगार्ड यांनी सहभाग घेतला.गावातुन अचानकपणे पोलीसांनी शक्तिप्रदर्शन करत पथसंचलन केल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरु होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या