शिष्यवृत्ती परिक्षेत शिरसगावच्या विद्यार्थ्यांचे यश

शिरसगाव काटा,ता.७ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत शिरसगाव काटा,चव्हाणवाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत हि परिक्षा घेण्यात आली होती.यामध्ये शिरसगाव काटा शाळेचे नउ तर चव्हाणवाडी शाळेचे पाच विद्यार्थी चमकले आहेत.

शिरसगाव काटा शाळेतील आदित्य लक्ष्मण जगताप,सोहम सुधीर बेंद्रे, योगानंद सुनिल काळे, रोहन कांतीलाल गोरे,स्नेहल राहुल शितोळे,करिश्मा ज्ञानेश्वर फडतरे,विवेकानंद सुनिल काळे, तुषार बाजीराव गोरे यांनी चांगले गुण मिळवित घवघवीत यश प्राप्त केले आहे.या विद्यार्थ्यांना सुवर्णा नलगे,सुवर्णा चंद्रकांत खैरे यांनी मार्गदर्शन केले होते.तसेच चव्हाणवाडी शाळेतील इश्वरी सोमनाथ चव्हाण,सायली मारुती वाळके,स्मित शितलकुमार तावरे,यशराज संदिप गायकवाड,यशराज राजेंद्र जगताप यांनी उत्कृष्ट गुण मिळविले आहे.या विद्यार्थ्यांना दादाभाउ दिवटे, संध्या लगड व काकासाहेब लगड यांनी मार्गदर्शन केले होते.

यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच सतीश चव्हाण,घोडगंगा संचालक नरेंद्र माने, बाजारसमितीचे संचालक विजेंद्र गद्रे,माजी जि.प.सदस्य दादासो कोळपे,सोसायटीचे चेअरमन अण्णासो कदम व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या