डावखरे विद्यालयातील २६ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

Image may contain: 23 people, outdoorपिंपळे खालसा,ता.८ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : पिंपळे खालसा-हिवरे कुंभार (ता.शिरूर)येथील स्वातंत्र्य सेनानी कै.शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालयातील २६ विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

रिया निर्मळ ही विद्यार्थिनी २४२ गुण मिळवून पुणे जिल्हा ग्रामीण मध्ये प्रथम आल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक सूर्यभान बर्वे यांनी दिली.

पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले विद्यालयातील विद्यार्थी व त्यांना मिळालेले गुण पुढीलप्रमाणे:- रिया राजाराम निर्मळ(२४२), जगताप ऋषिकेश संजय (२४०),धनंजय संतोष नरवडे (२२४), यश संतोष शेवाळे(२२२),श्रेयश विलास रणसिंग (२२२),कोमल नवनाथ धुमाळ (२१६),प्रतिक भाऊसाहेब बांगर (२१६),साहिल विकास आदक(२१४),अविष्कार संतोष जाधव(२१२),सई संतोष तांबे (२१२),प्रांजल सुखदेव शेळके (२१०),साहिल संजय गायकवाड (२०६),तुषार पांडुरंग शिंदे (२०६),प्रांजल सोमनाथ पवार (२०४),मयुरी काळूराम मोरे (२००),आदित्य यशवंत टाकळकर (२००),कौशल श्यामराव गरूड(१९४),अक्षय संपत आदक (१९०),समिक्षा चांगदेव तांबे(१८४),हर्षल सतिश घाडगे (१८२),रोहित मारूती राऊत (१८०),सायली संतोष शिर्के (१७६),मयूर वसंत कोरडे (१७२),यशोधन हरिभाऊ खैरे (१७२,तनुष्का ज्ञानेश्वर जाधव (१६८),कानिफनाथ राजाराम गायकवाड (१६४).

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कल्याण कडेकर, मोहन बोराटे, ऊर्मिला मांढरे, राजू घोडके या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष  ज्ञानोबा तांबे  सचिव  सोपान धुमाळ  खजिनदार बापूसाहेब परभणी  तसेच  संचालक मंडळ  व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या