रामोशी समाजाचा शिरूरमध्ये विविध मागण्यांसाठी मोर्चा

Image may contain: 18 people, people smiling, people standing, crowd and outdoorशिरूर, ता.८ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : रामोशी समाजाच्या विविध मागण्यांसाठी शिरुरला मोर्चा काढण्यात आला होता.

रामोशी बेरड, बेडर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे, या व इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. 7) येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.या मोर्चात शिरूर शहर व तालुक्‍यातील विविध संघटना व सर्वधर्मीय बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात काही काळ आंदोलकांनी ठिय्या दिला.

त्यानंतर झालेल्या सभेत मदने म्हणाले, ""रामोशी बेरड, बेडर समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि हालअपेष्टामय जीवन जगणाऱ्या समाजबांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने आरक्षण दिले पाहिजे.''संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने, दिनेश चव्हाण, बापूसाहेब खोमणे, महिला आघाडीच्या प्रदेश संघटक पूजाताई शितोळे, गोरक्ष खोमणे, विजय जगधने, दादाभाऊ लोखंडे, रामदास शिंदे आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.कर्नाटक व आंध्र प्रदेशमध्ये रामोशी समाज अनुसूचित जमातीमध्ये आहे. मग महाराष्ट्रातच का नाही, असा सवाल चव्हाण यांनी केला.शिरुरचे तहसीलदार रणजित भोसले यांना यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या