करडेत जमीनीच्या वादातून गुन्हे दाखल

करडे,ता.८ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : येथे जमिनीच्या वादातून दलित व्यक्तीस बेदम मारहाण  केल्याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात दोन जणांवर अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, फिर्यादी पोपट दादा गायकवाड यांची करडे येथे गट नं ४९८ मध्ये ३ एकर जमीन आहे.त्यांच्याच शेजारी चिकु ऊर्फ किसन आण्णा बांदल याची जमीन असुन चिकु बांदल हा गेले आठ दिवसापासून पोपट गायकवाड यांना तुम्ही मला तुमची एक गुंठा जमीन रस्त्यासाठी विकत द्या असे म्हणत होता.मी घरच्यांचा विचार घेऊन तुला सांगतो असं पोपट गायकवाड यांनी बांदल याला सांगितले.

रविवारी (दि ५ रोजी) पोपट गायकवाड हे गावातील चौकात बसलेले असताना चिकु बांदल व सुरज लाहोटी हे दोघेजण तिथे आले. आणि पुन्हा जमिनीचा विषय काढला.त्यावेळी गायकवाड यांनी तु माझ्या मेव्हण्याला विचार असे उत्तर दिले.त्यावेळी चिकु बांदल याने शिवीगाळ करीत पोपट गायकवाड यांना काठीने मारहाण केली.तसेच तलवारीचा धाक दाखवत फरफटत नेऊन स्वतःच्या चारचाकी गाडीत बसवुन एका वस्तीवर नेऊन मारहाण केली.तसेच पुन्हा गावात आणुन पोपट गायकवाड यांचे वडील दादा गायकवाड यांना चारचाकी गाडीत बसवले.तसेच त्यांच्या मुलांनाही मारहाण केल्याचे गायकवाड यांनी फिर्यादीत नमुद केले आहे. शिरुर पोलीस ठाण्यात चिकु बांदल आणि सुरज लाहोटी यांच्यावर अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास डी वाय एस पी गणेश मोरे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या