आखाड साजरा करण्यासाठी चांगली हॉटेल कोणती?

Image may contain: foodशिरूर, ता. 8 ऑगस्ट 2018: आखाड महिना संपत आलाय. शिरूर तालुक्यात 'आखाड पार्ट्यां'नी जोर धरला आहे. विविध मांसाहारी हॉटेलात खवैय्यांची गर्दी होत असून, शेतांमध्येही आखाड पार्ट्या रंगू लागल्या आहेत.

आषाढ महिन्यात (आखाड) मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाण्यावर भर असतो. अनेक जण घरगुती मांसाहाराचा बेत करुन आखाड साजरा करतात. मात्र गेल्या काही वर्षात आखाड महीना इव्हेंट झाला आहे. सध्या कुटुंबीय, मित्र-मंडळी, कार्यालयातील सहकारी यांच्यासोबत एकत्र येऊन आखाड साजरा करण्याकडे कल वाढला आहे.

अनेकजण आखाड साजरा करण्यासाठी विविध मांसाहारी हॉटेलांना पसंती देत आहेत. शिरूर तालुक्यात मांसाहारी हॉटेलांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच या भागातील मांसाहारी हॉटेलात खवैय्यांची गर्दी वाढू लागली आहे. तर अनेक जण गावरान पद्धतीने शेतांमध्ये आखाड पार्ट्या करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळेच या भागातील शेतांमध्ये आखाड पार्ट्या रंगू लागल्या आहेत. आखाड महिना संपत आलाय.

तुपातलं मटन, गावरान कोंबडा, तांबडया आणि काळ्या रस्स्यातील मटन, मटन-चिकन दम बिर्याणी, तंदूर, मच्छी फ्राय या पदार्थांना हॉटेलांमधून मागणी आहे. अनेकजण शेतात चुलीवर गावरान पद्धतीने बनविलेल्या मटन भाकरीवर ताव मारून आखाड साजरा करत आहेत.

शिरूर तालुक्यात मांसाहारी पदार्थांची लहान-मोठे अनेक हॉटेल्स आहेत. पण... तुम्हाला माहित असलेली व चवदार कोणती आहेत. याबद्दल नक्की सांगा अन् व्हिडिओ असेल तर shirurtaluka@gmail.com वर जरूर पाठवा.

व्हिडिओ शूट करण्यासाठी संपर्क साधाः
सतीश केदारी - 8805045495
तेजस फडके - 9766117755

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या