पुढा-यांच्याच गावात मिळतोय फक्कड चहा..!

Image may contain: drinkशिरुर, ता.११ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात पुढा-यांचं गाव म्हणून ओळख असलेल्या गावातच फक्कड चहा मिळत असून या गावांत चहाच्या आदरातिथ्याने तुम्हीही भारावूनच जाल.

शिरुर तालुक्यात पुढा-यांची गावे म्हणुन तळेगाव ढमढेरे अन् मांडवगण फराटा ही दोन गावं पुढा-यांची गावं म्हणून ओळखली जातात. या गावांतील नेते मंडळी तालुक्यातील साखर कारखाना असो अथवा अन्य सहकारी संस्था या गावातील राजकारणी मंडळींची  नावे तालुक्याच्या पटलावर नेहमीच चर्चिली जातात. परंतु तळेगाव अन तालुक्यातील अन्य गावांपेक्षा मांडवगण फराटा या गावात चहाचे स्थान निराळेच आहे. राजकारणी मंडळींची भलतीच चलती असते. त्यामुळे बडे-बडे नेतेमंडळी या गावांना दुर्लक्षुन पुढे जातच नाही. गावात केव्हाही आलात तर स्वागत चहानेच होते.

www.shirurtaluka.com ने याबाबत शिरुर तालुक्यातील नागरिकांची मते जाणुन घेतली असता, शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील गंगाई, शिरुर शहरातील विसावा, कोरेगाव भिमाचे सोमेश्वर, मांडवगण चे आनंदभुवन अशा अनेकांना पसंती दिली आहे. सर्वाधिक पसंती मांडवगण गावाला दिल्याने येथील नागरिकांची चहाबाबत  प्रतिक्रिया घेतली असता, दिवसाला थोडे नव्हे तर किमान दिडशे ते दोनशे लिटर चहा दिवसभर गावातील ठिकठिकाणच्या दुकानात केला जातो. या गावातील कोणत्याही चहाच्या हॉटेलात गेलात तर चवही निरनिराळी चाखायला मिळेल. या चहा च्या माध्यमातुन गावात दिवसाकाठी मोठ-मोठी उलाढाल होत असते. केवळ पुढारीच नव्हे तर परिसरातील अनेक नागरिक केवळ चहा पिण्यासाठीच या गावात येत असतात. या गावात आल्यानंतर व चहा पिल्यानंतर मंञमुग्ध होउन आपण न गेला तर नवलच...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या