गुजर प्रशालेचे नऊ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

तळेगाव ढमढेरे, ता.१२ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेतील ९ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
         
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील गुजर प्रशालेचे  शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे :- प्राथमिक शिष्यवृत्ती -पायल भुजबळ(२१८ गुण). माध्यमिक शिष्यवृत्ती - सलोनी केदारी(२५२ गुण), यशस्वी पाटील(२१८ गुण), ऐश्वर्या राऊत(२०२ गुण), वैष्णवी भगत(१७८ गुण), साक्षी कदम(१६८ गुण), आदित्य ढमढेरे(२२२ गुण), मानस काळे(२१४ गुण), संकेत ढमढेरे(१७२ गुण). सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना जया पुजारी, जयवंत कोकरे, रजनी राऊतमारे, नंदा सातपुते, अर्चना गोरे, रूपाली ढमढेरे, हर्षदा परदेशी, सरला ढमढेरे, सोनाली शेळके, अरुण भगत यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभ गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, संचालक महेश ढमढेरे, प्राचार्य माणिक सातकर, उपप्राचार्य जगदीश राऊतमारे, पर्यवेक्षक राजाराम पुराणे यांनी अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या