शिरुर तालुक्यात स्वातंञ्यदिन उत्साहात साजरा (Video)

Image may contain: one or more people, people standing, sky, crowd and outdoorशिरुर,,ता. १५ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : शिरुर शहरासह शिरुर तालु्कयात भारताचा ७२ वा स्वातंञ्यदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

शिरुर शहरात शिरुर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.यावेळी शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे,शिरुर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे,शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अॅलिस पोरे,शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदिप जठार व विविध विभागाचे अधिकारी,शिरुर नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, नागरिक व विविध शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी शिरुर पोलीस स्टेशनच्यावतीने मानवंदना देण्यात आली.
शिरुर नगरपरिषदेचे झेंडावंदन  नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी केले.शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे झेंडावंदन बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी केले. तसेच शिरुर शहर व परिसरातील विद्याधाम प्रशाला, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, सिताबाई थिटे फार्मसी कॉलेज, न्यु इंग्लिश स्कुल, नगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये ध्वजवंदन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा, न्हावरा, शिरसगाव काटा, शिक्रापुर, तळेगाव ढमढेरे, टाकळी हाजी, पिंपरखेड आदी तालुक्यातील विविध भागात शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. निमोणे येथील दुर्गेवस्ती शाळेत अतुल पांडुरंग दुर्गे यांनी संगणक भेट म्हणुन दिला. तर शिरसगाव काटा येथील येळेवस्ती शाळेसही संगणक भेट म्हणुन देण्यात आला. शिरुर तालुक्यात स्वातंञ्यदिनानिमित्त सकाळपासुन प्रभातफे-या काढण्यात आल्या होत्या.यामुळे सर्वञ उत्साहाचे वातावरण पहायला मिळत होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या