पोलीस उपनिरीक्षक गोरे यांना महासंचालक सन्मान चिन्ह
रांजणगाव गणपती,ता.१६ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे यांचा पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देउन सन्मान करण्यात आला.
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे हे या पुर्वी गडचिरोली भागात कार्यरत होते.गडचिरोली भागात काम करत असताना नक्षलवादी विरोधी अभियान यशस्वी राबविताना अनेक नावीन्यतपुर्ण योजना त्यांनी त्या भागात राबविल्या.नक्षल्यांमध्ये परिवर्तन घडवुन आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
शासनाच्या योजना गडचिरोली भागात प्रभावीपणे राबविल्या.त्याचबरोबर नक्षलीबिमोड करण्याकामी महत्वाची भुमिका बजावली.त्यांच्या याच कार्याची दखल घेउन त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहिर करण्यात आले होते.स्वातंञ्यदिनाचे औचित्य साधुन पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या हस्ते हे सन्मानचिन्ह देउन पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे यांचा सन्मान करण्यात आला.