योगेश ओव्हाळ यांचा पदाचा राजीनामा

शिरुर, ता. १६ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : शिवसेनेचे शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख श्री. योगेश विठ्ठल ओव्हाळ यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिला आहे.

शिवेसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांना या संदर्भात त्यांनी राजीनामा पञ  पाठविले आहे. त्यांनी दिलेल्या पञात असे म्हटले आहे कि, संपुर्ण राज्यात मराठा आरक्षण मागणी मागणी करता सकल मराठा बांधव लढा देत आहे.परंतु अनेक वर्षांपासुन मराठा बांधव शिवसेना पक्षाशी आपली सामाजिक बांधिलकी जपत आला व न्याय हक्कासाठी लढा दिला. परंतु, त्याच समाजाची आरक्षणासाठी लढाई चालु असताना खंबीरपणे पक्ष पाठीशी खंबीर उभा राहिला नसल्याचे म्हटले आहे. या कारणावरुन शिवसेना पक्षाचा व पदाचा राजीनामा देत असल्याचे नमुद केले आहे.

ओव्हाळ यांनी गेल्या दोन वर्षात शिवसेना शेतकरी सेनेच्या माध्यमातुन अनेक आंदोलने व मोर्चे काढले असुन शिरुर तालुक्यात त्यांच्या राजीनाम्याने चर्चा सुरु आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या