गुजर प्रशालेतील गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप

Image may contain: one or more people and people standingतळेगाव ढमढेरे, ता.१७ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेतील गरजू विद्यार्थिनींना दहा सायकलींचे वाटप करण्यात आले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या सायकलींचे वाटप करण्यात आले. पुण्यातील उद्योजक प्रणयकुमार गुजर व लेखिका अंजली गुजर यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशालेतील दूरवरून येणाऱ्या व गरजू विद्यार्थिनींना या सायकली दिल्या. मान्यवरांच्या हस्ते या सायकलींचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, संचालक महेश ढमढेरे,  विजयकुमार गुजर, राजेश ढमढेरे, सरपंच ताई शेलार, प्राचार्य डॉ. पराग चौधरी, सुनंदा लोले, उपप्राचार्य जगदीश राऊत मारे, प्रभाकर ढमढेरे, विजयराव जेधे आदी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य माणिक सातकर यांनी केले. जालिंदर आखाडे, हर्षाली भोईटे  व कुंडलिक कदम यांनी सूत्रसंचालन केले तर राजाराम पुराणे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या