विशाल घायतडक यांचा वाढदिवसाचा खर्च विविध उपक्रमांसाठी

Image may contain: 7 people, people sittingशिरुर, ता.१७ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : भाजपचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल निळकंठ घायतडक यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून गरजूंना मदत करत वाढदिवस साजरा केला.

भाजपचे विदयार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल निळकंठ घायतडक यांनी वाढदिवसाचा अनाठायी होणारा खर्च टाळून वाढदिवस साधेपणाने साजरा केला.

सकाळी न्हावरे फाटा  येथील मुकबधिर विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.त्याचबरोबर शिरुर शहरातील शासकिय मतिमंद संस्थेतील मुलींना अल्पोपहार देण्यात आला.त्याचबरोबर रामलिंग रोड वरील आकांक्षा या विशेष मुलांच्या संस्थेस इतर खर्च टाळुन आर्थिक मदत देण्यात आली.सायंकाळी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांनी नियोजित कार्यक्रम रद्द केले.
 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या