माजी सैनिकाला 'झेंडयाचा मान'; तरीही 'राजकिय ताण'

Image may contain: one or more people, sky, tree, plant, house and outdoorसादलगाव, ता. 17 ऑगस्ट 2018 (प्रतिनिधी): येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्वतंत्रदिनाचा झेंडा फडकविण्याचा मान सादलगाव येथील माजी सैनिक सदाशिव रामभाऊ कारकूड यांना देण्यात आला.

13 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये स्वतंत्रदिनाचा झेंडा फडकविण्याचा मान गावातील माजी सैनिकला देण्याचा ठराव एकमताने झाला.स्वतंत्रदिनाच्या दिवशी गावातील झेंडा वंदन अनेक वर्षापासून चालत आलेल्या परंपरेला फाटा देवून एका सैनिकाच्या हस्ते होणार असल्यामुळे हा विषय तालुकाभर चर्चेचा ठरला होता. देशासाठी सेवा बजावलेल्या माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण होणे हे निश्चित गावच्या नावलौकीकात भर पडून परिसरामध्ये गावाची प्रतिमा उंचावणारा विषय झाला असून, आता गावोगावी सैनिकाला झेंडा फडकविण्याचा सन्मान दिला जात आहे. गावमधील सैनिकांच्या प्रती असणारी भावना व त्यांचे देशासाठी झालेल्या असामन्य सेवेबददल हा मान देणे योग्य असल्याचे मत गावामध्ये उमटलेले आहे. ज्या गावामध्ये असे सैनिक राहतात त्याच गावाने असा मान देणे हा मोठा अभिमानाचा व गर्वाने सांगण्याचा असल्याचे मत माजी सैनिक कारकूड यांनी सांगितले.


झेंडा वंदनावरुन राजकिय वाद...
एकीकडे सैनिकाला हा सन्मान देण्याचे ठरले खरे. परंतु, गावच्या सरपंचाने याला विरोध दर्शविला. आपला हक्क आपल्याला मिळावा, झेंडयाचा मान हा संविधानाने प्रथम नागरिक या नात्याने सरपंचाला मिळालेला आहे. तो मलाच मिळावा म्हणून येथील महिला सरपंचानी हट्ट केला. प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोचले. झेंडयाचा मान एका माजी सैनिकाला जाणार म्हटल्यावर काही राजकारण्यांनी या प्रकरणावर रातोरात खळबत करुन असे होवू द्यायचे नाही, असा चंग बांधला. स्वतंत्रदिनाच्या या राष्ट्रीय कार्यक्रमाला सादलगावात वेगळे वळण लागू नये म्हणून शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक कैलास घोडके यांनी दोन्ही गटातील प्रमुखांना बोलून घेतले. यामध्ये सरपंचाचा गैरसमज दूर करुन समजून सांगितले. माजी सैनिकांच्या हस्ते सादलगाव शाळेतील झेंडा वंदन करण्याचे ठरले. दरम्यान झेंडा वंदनाच्या दिवशी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सकाळी गावामध्ये चोख बंदोबस्त ठेवला होता. गावातील राजकारण करणाऱयांना राष्ट्रीय सणाचेही भान न ठेवता आल्यामुळे या विषयाची तालुकाभर मोठी चर्चा झाली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या