शिंदोडीत दोन शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला (Video)

शिंदोडी, ता.१८ अॉगस्ट २०१८ (तेजस फडके) : शिंदोडी (ता.शिरुर) येथील मजुरी करणाऱ्या मनुभाई पठाण व रुबाबबाई पठाण यांच्या दोन शेळ्यांवर गुरुवारी पहाटे बिबट्याने हल्ला केल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या.
       
पठाण कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून शिंदोडी येथे वास्तव्यास असुन मोलमजुरी करुन ते आपला उदरनिर्वाह करतात.त्याच पैशातुन त्यांनी दोन शेळ्या विकत घेऊन त्यांचं संगोपन ते करत होते.परंतु गुरुवारी रात्री १२ वाजता अचानक बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. त्यात दोनही शेळ्यांचा मृत्यू झाला. शेळीपालन हेच पठाण कुटुंबाचं मुख्य उत्पनाच साधन असल्यानं त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.वनविभागाचे वनरक्षक विशाल चव्हाण यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

शिंदोडीत गेल्या वर्षभरापासुन बिबटयाचा वावर असुन वनविभागाने या परिसरात पिंजरा लावावा तसेच शासनाकडुन या गरीब कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी शिंदोडीचे माजी सरपंच इंद्रभान ओव्हाळ आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक वाळुंज यांनी केली आहे.

याबाबत शिरुर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले ग्रामस्थांनी बिबटया दिसल्यास घाबरुन न जाता.फटाक्यांचा किंवा भांड्याचा आवाज करावा.तसेच रात्रीच्या वेळेस शेतात जाताना काठी गोफण किंवा चाबूक हातात घेऊन मोठ्याने आवाज केल्यास बिबटया जवळ येणार नाही. सध्या पिंजरा शिल्लक नसल्याने पिंजरा उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी सतर्क राहावे.
Image may contain: 12 people, people standing and outdoor

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या