पाबळमध्ये बेधडक महाराष्ट्रचा कार्यक्रम जल्लोषात साजरा

Image may contain: 8 people, people standing and outdoor
पाबळ, ता. 24 ऑगस्ट 2018 (अरुण वाळुंज): येथील श्री भैरवनाथ विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालयात बेधडक महाराष्ट्रचा कार्यक्रम जल्लोषात साजरा मोठ्या जल्लोषात नुकताच साजरा झाला. कार्यक्रमाचे उदघाटन अध्यक्ष भगवान दगडू घोडेकर यांच्या हस्ते झाले.

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक अन् साहित्य क्षेत्रातील आदराचे नाव हनुमंत चांदगुडे, रज्जाक शेख, सुमित गुणवंत, भावना बगले-येवले यांसह बेधडक महाराष्ट्र्रचे अध्यक्ष अरूण वाळुंज यांचा सहभाग श्रोत्यांना खिळवून ठेवणारा होता.

"जे भिडतय मनाला, तेच देऊ तुम्हाला" ही टॅगलाईन वापरत नावीन्य देणारा हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हनुमंत चांदगुडे सरांनी आपल्या शेतीमातीच्या कवितांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली. मातीतील जगण शब्दांनी सांगणाऱ्या कवीची अफाट कल्पना शक्ती व शब्दांच साम्राज्य पाहून प्रेक्षकांची मने कधी जिंकली हे कळले सुद्धा नाही.

Image may contain: 1 person, crowd, shoes and outdoor

आपल्या चॅटिंग, कॉकटेल, वासरू अशा अष्टपैलू व विनोदी कवितांनी कार्यक्रमाची उंची वाढली. 'घर वाटत कॉइन बॉक्स न बायको वाटते लँडलाईन, चॅटिंग वरची म्हातारी पण वाटते तिच्यापेक्षा फाईन' तसेच "कॉकटेल झालीत माणस सारी, बॉयलर झाल्यात नाती, जर्सी कालवड पहिली ढुसणी मालकालाच देती"सादर करताना हास्याची लहर पसरवून दिली. "नको बोलू तडाफडा, नको मानू रे परकी, नाही जगामधी माया पुन्हा आईच्या सारखी" म्हणत पुन्हा एकदा वेगळ्या विश्वात नेले. "कवितेला जावे दिस, जन्मा तुकाराम यावा, देह कबिराचा दोहा, शब्द वैकुंठाला जावा"अशा अप्रतिम शब्दांनी साद घातली. रज्जाक शेख यांनी हिंदू मुस्लिम कौमी एकतेवरची कविता गात सुरांची मैफल उधळून दिली. "तू कशाला मी कशाला कारे भांडतो, एकरंगी रक्त आपले का उगाच सांडतो." व "ती मला पाहते सारखी सारखी"या हास्य कवितांनी देखील धमाल उडवत कार्यक्रमाची रंगत वाढवली. सुमित गुणवंत यांच्या एक पुरुष व ससा या कवितेत "तुझ्या आठवणीनं मी वेडापिसा ग, पडलं पडलं आभाळ मी भेदरलेला ससा ग" यासह "करून नखरा बनवला बकरा" या सुंदर शब्द फेकीवर प्रेक्षकही फिदा होताना दिसले. अरुण वाळुंज यांच्या तिने मांडला प्रेमाचा बाजार व प्रेम करावे हिरोसारखं या अफलातून कवितेने हास्य पसरवत विद्यार्थ्यांना त्यांच्या जगात सोडून दिले. धोका देणाऱ्या मुलींपेक्षा वटवाघूळ बरी असतात, उलटी जरूर लटकतात पण उलट्या काळजाची तर नसतात यावर विद्यार्थ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया होत्या. भावना बगले-येवले यांच्या अस्तित्व व जिवलग या कवितेने विचार करण्यास भाग पाडले."सलणाऱ्या त्या दुःखाला ना दिशा मिळाली कोठे, असह्य होई हे मन मग कधी साद हवीशी वाटे" या अप्रतिम ओळींबरोबर त्यांच्या बहारदार सुत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

"नव कवींना दिग्गज कवींसोबत व्यासपीठ मिळावे व ग्रामीण टॅलेंट जगासमोर यावं हाच बेधडक महाराष्ट्र्रचा हेतू आहे असे आर्यवीर वाळूंज फाऊंडेशन ची निर्मिती असलेल्या बेधडक महाराष्ट्र चे अध्यक्ष अरुण वाळूंज यांनी सांगितले.

अविनाश क्षीरसागर सर व संतोष क्षीरसागर सरांसह प्राचार्य कैलास धुमाळ यांनी कार्यक्रमाचे परिपूर्ण आयोजन केले. विवेक बच्चे यांचीही उपस्थिती या कार्यक्रमास लाभली. जनार्दन जाधव (माजी कृषी संचालक), शिवाजीराव जाधव व नामदेवराव पानसरे संचालक यांच्यासह प्रा. जितेंद्र थिटे सर व अरुण निकम यांच्यासह सर्वांचे मोलाचे योगदान लाभले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या