लोकांमध्ये संवाद नसल्याने सुसंवाद होत नाही : कवडे

Image may contain: 1 person, standing and crowdविठ्ठलवाडी, ता.२७ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : लोकांमध्ये संवाद नसल्याने सुसंवाद होत नाही त्यामुळे समाजाची सध्या वाताहत होताना दिसत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी केले.          

विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे श्री पांडुरंग विद्यामंदिर आयोजित समन्वय व्याख्यानमालेत 'एकविसाव्या शतकातील मूल्याधिष्ठित सर्वांगीण शिक्षण' या विषयावर महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे बोलत होते.

यावेळी मुख्याध्यापक सुरेश थोरात, उपसरपंच बाबाजी गवारे, विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव हरिश्चंद्र गवारे, माजी उपसरपंच दिलीप गवारे, राजेंद्र शिंदे, सोसायटीचे उपाध्यक्ष रायचंद शिंदे,पोलीस पाटील शरद लोखंडे,लक्ष्मण गवारे, बापू पवार, किसन गवारे, केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना कवडे म्हणाले की माणसा माणसात सुसंवाद साधण्यासाठी सकस विचार करा,वाईट विचारांचा त्याग करा, गावागावांमध्ये वाचन कट्टा करण्याचा प्रयत्न करावा, तसेच गावच्या ग्रामसभेत असा संकल्प करा की,मी प्रामाणिकपणे वागेन असा संकल्प करा.श्यामची आई सारख्या ग्रंथाचे पारायण करा असे आवाहनही त्यांनी केले. गावाने केलेला संकल्प पुढील अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत ठरेल. स्मार्टग्राम मधील माणसं स्मार्ट असली पाहिजेत माणसांची मने स्मार्ट झाली की गावे आपोआपच स्मार्ट होतील. राष्ट्राचा जाज्वल्य इतिहास अखंड तेवत ठेवण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण  करून स्वतःच्या स्वयंउन्नतीसाठी संकल्प करावा. असेही यावेळी बोलताना कवडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थिनींनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर चांदगुडे यांनी केले तर  संगीता गवारे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या