शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रोहिदास काळे
निमोणे, ता.२७ अॉगस्ट २०१८(प्रतिनीधी) : निमोणे (ता. शिरुर) येथील रोहिदास काळे यांची नुकतीच शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली असून संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विठ्ठलराव पवार यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
शिक्रापुर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.निवडीनंतर बोलताना रोहिदास काळे म्हणाले, "पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असुन संघटनेची ध्येय धोरणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करुण संघटना वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माझिरे, जिल्हा कार्याध्यक्ष भरत काळे, शिरुर तालुका अध्यक्ष नवनाथ गव्हाणे व मान्यवर उपस्थित होते.