...त्यांनी केला विशेष मुलांचा रक्षाबंधन 'स्पेशल'

Image may contain: 1 person, sittingशिरुर, ता.२८ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी) : रक्षाबंधन..बहिण भावाचे अतुट नाते अधिक दृढ करणारा सण...परंतु विशेष मुलांच्या जीवनात आनंदाचे क्षण यावेत यासाठी पुढाकार घेतला तो वारसा फाउंडेशन अन रांजणगाव गणपती येथील रावसाहेब आवारी इंग्लिश मिडियम स्कुल ने....
Image may contain: 1 person, indoor
वारसा फाउंडेशनच्या महिलांनी व आवारी इंग्लिश मिडियम स्कुलच्या विशेष मुलांनी शिरुर येथील रामलिंग रोड वरील आकांक्षा फाउंडेशन या विशेष मुलांसोबत येउन आज रक्षाबंधन साजरा केला. विशेष मुलांना राख्या बांधल्या तसेच खाउवाटप केला. यावेळी वारसा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजुश्री थोरात, शिल्पा बढे, शशिकला काळे, अलका ढाकणे आदींसह महिला उपस्थित होत्या.

दिवाळी असो कि इतर कोणतेही सण...
रावसाहेब आवारी स्कुलचे विद्यार्थी आकांक्षा च्या मुलांसोबत प्रत्येक सण साजरे करतात. रक्षाबंधनचा सण याहीवर्षी संस्थेत येउन आवारी इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला.यावेळी रावसाहेब आवारी इंग्लिश मिडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका सुनंदा पवार व त्यांचे सहकारी शिक्षक, पालक, आकांक्षा एज्युकेशनलचे विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी आकांक्षा फौंडेशनच्या संस्थापिका राणीताई चोरे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन संस्थेविषयी माहिती दिली. शेवटी सर्वांचे आभार मानले

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या